MATTHEW
मत्ती
1
1 अब्राहामाच्या पोरगा, दाविद ह्याचा पोरगा, येशू ख्रिस्ताची वंशावली. 2 अब्राहामानं इसहाकाले जन्म देला अन् इसहाकानं याकोबाले जन्म देला अन् याकोबानं यहूदा अन् त्याच्यावाल्या भावांना जन्म देला. 3 अन् यहूदानं पेसेस व जेरह यांयलें तामारेच्या पासून जन्म देला,अन् पेरेसानं हेस्रोनाले जन्म देला,व हेस्रोनानं अशमाले जन्म देला. 4 अन् अरामानं अम्मीनादाबाले जन्म देला,व अम्मीनादाबानं नहशोनालें जन्म देला,अन् नहशोनानं सल्मोनाले जन्म देला, 5 अन् सल्मोनाने राहाबे पासून बवाजाले जन्म देला, अन् बवाजानं रुथपासून ओबेदाला जन्म देला,अन् ओबेदानं इशाय यालें जन्म देला. 6 अन् इशायाले दावीद राज्याले जन्म देला, अन् दाविदानं जे पयले उरीयाची बायको होती तिच्यापासून शलमोनाला जन्म देला. 7 अन् शलमोनानें रह्बामाला जन्म देला,अन् रह्बामाने अबियाले जन्म देला,अन् अबियाने आसा यालें जन्म देला. 8 अन् आसानें यहोशाफातलें जन्म देला,अन् यहोशाफातनें योरामाला जन्म देला,अन् योरामानं उज्जीया यालें जन्म देला, 9 अन् उज्जीयानं योतामाला जन्म देला,व योतामानं आहाजाल यालें जन्म देला,अन् आहाजाने हिज्कीया यालें जन्म देला. 10 अन् हिज्कीयाने मनश्शे यालें जन्म देला,अन् मनश्शेने आमोनाला जन्म देला,व आमोनाने योशीया यालें जन्म देला. 11 अन् बंदी होऊन बाबेलास जायाच्या वाक्ती,योशियानें यखंन्या,अन् याच्यावाल्या भावांना जन्म देला. 12 अन् बंदी होऊन बाबेलास पोहचल्या नंतर यखंन्यानें शालतीराला जन्म देला,अन् शालतीराने जरुब्बाबेलाला जन्म देला. 13 अन् जरुब्बाबेलाने अबिहुदाला जन्म देला,व अबिहूदानें इल्याकिम यालें जन्म देला,अन् इल्यकिमानें अज्जुराला जन्म देला. 14 अन् अज्जुरानें सादोकाला जन्म देला,अन् सादोकानें याखीमाला जन्म देला, अन् याखीमाने इलीहुदाला जन्म देला. 15 अन् इलीहुदाने इलीयाज्राला जन्म देला,अन् इलीयाज्राने मत्तानालें जन्म देला,अन् मत्तनानें याकोबाला जन्म देला. 16 अन् योकोबाने योसेफाला जन्म देला,जो मरीयेचा नवरा होता,अन् त्याच्या पासून येशू ख्रिस्त म्हणतात तो जन्मला. 17 अब्राहामापासून तर दाविदा पर्यत सर्व्या चवदा पिढ्या झाल्या,अन् दाविदा पासून बाबेलास बंदी होऊन जाया पर्यत चवदा पिढ्या,अन् बाबेलात बंदी होऊन पहुच्याच्या वाक्ती लग येशू ख्रिस्ता पर्यत चवदा पिढ्या झाल्या. 18 अन् येशू ख्रिस्ताच्या जन्म ह्या प्रकारे झाला,त्याच्यावाली 'मायआईइची सोयरिक योसेफाच्या संग झाली,तवा एकत्र येण्याच्या पयले ती पवित्र आत्म्यापासून गरोधर झालेली दिसून आली. 19 तिच्यावाला नवरा योसेफ जो धर्मी माणूस होता,त्याच्यावाली इच्छा तिले बदनाम करण्याची नोती, पण तिले गुप्तपणे टाकून देण्याचे असे त्यानं मनांत आणलं. 20 जवा तो ह्या गोष्टीचा विचारांत होता,तवा प्रभूचा एक देवदूत त्याले सपनात दिसून म्हणू लागला,हे योसेफा दाविदाच्या पोरां, तू आपल्या बायको मरीयेले अंगीकार करण्यासाठी भेऊ नको,कावून कि जे तिच्या गर्भात हाय,ते पवित्र आत्म्याकडून हाय. 21 अन् तिले पोरगा होईन,अन् त्याचं नावं येशू ठेवजोकं कावून कि तो आपल्या लोकांना त्यायच्या पापांपासून तारिल.'' 22 अन् हे सगळ ह्या साठी झालं,कि प्रभूनं जे काई भविष्यवक्त्यांच्या द्वारे सांगतल होतं,ते पूर्ण व्हावं. 23 ते असे कि ''पाहा'' एक कुमारी गरोधर होईन,अन् एका पोराला जन्म देईन,अन् त्याच्यावालं नांव ''इम्मानुएल'' ठेवण्यात येईन,त्याच्या अर्थ हा हाय कि 'देव बरोबर हाय'. 24 तवा योसेफ झोपितून उठल्यावर त्यानं प्रभूच्या दूतांन जसी आज्ञा देली होती,तसेंच केलें अन् आपल्या बायकोच्या अंगीकार केला. 25 अन् ते पोराला जन्म देई पर्यत,तो तिच्यावाल्या पासी नाई गेला,अन् त्यानं त्याचं नावं येशू ठेवलं.